हरभरे बटाट्याची चटपटी

(0 reviews)
हरभरे बटाट्याची चटपटी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. हरभरे रात्रभर भिजत घालावे व सकाळी उपसून चाळणीवर निथळावे. बटाटे उकडून सोलावे. हरभरे कुकरमध्ये शिजवून घ्यावे. चिंच अर्धी वाटी पाण्यात तासभर भिजत ठेवावी. आले, लसूण, लाल व हिरव्या मिरच्या, खोबरे, निम्मी कोथिंबीर व जिरे एकत्र वाटावे. चिंचेचा घट्ट कोळ काढावा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापले की त्यावर तमालपत्र घालावे. वाटलेला मसाला त्यात घालून परतावा. शिजलेले चणे पाण्यासकट त्यावर घालावेत. मीठ घालावे व मंद आंचेवर ७-८ मिनिटे उकळू द्यावे. नंतर त्यात चिंचेचा कोळ, बटाटे, गूळ, उरलेली कोथिंबीर घालून आवश्यक वाटल्यास थोडे गरम पाणी घालावे. पाच मिनिटे चुलीवर ठेवावे व नंतर खाली उतरवून जरा मुरले की पोळी, पुरीसोबत खायला द्यावे.

You may also like