आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- डाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून ठेवावे. पातेल्यात तुपावर जिरे व मिरची फोडणीस टाकून त्यावर भाज्या, मीठ, हळद, टोमॅटो घालून ३-४ मिनिटे परतावे. त्यात डाळ घालून ५ वाट्या गरम पाणी घालावे. उकळी आली की तांदूळ वैरावे (घालावे). दहा मिनिटांनंतर आंच कमी करावी व झांकण ठेवावे. मंद आंचेवर खिचडी शिजू द्यावी. भाताची कणी शिजलेली दिसली की खाली उतरवून झाकूण ठेवावी. पाच मिनिटांनंतर कडेने चमचाभर साजूक तूप सोडावे. वाढताना कोथिंबीर व खोबरे वर शिवरावे. पापड, लोणचे, दही व ताक याबरोबर ही खिचडी खावी.
पथ्य करणारांना तसेच रविवारी टीव्हीच्या वेळेला वेळेला ही खिचडी सोयीची आहे.
You may also like