भाजीभात

(0 reviews)
भाजीभात

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावे. निम्मे खोबरे, कोथिंबीर व लिंबूरस वरून सजावटीसाठी वगळून ठेवावा. कुकरमध्ये मावेल अशा मोठ्या पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून हिरव्या मिरच्या फोडणीस टाकाव्या. त्या ९ वाट्या गरम पाणी घालावे. त्यात मीठ, धनेजिरेपूड, कढीलिंब, साखर घालावी. पाण्याला उकळी आली की त्यात दाणे, भाजी, मूग व तांदूळ वैरावे व खिचडी ढवळावी. दोन मिनिटे ठेवावे. ५-७ उकळ्या आल्या की नंतर पातेले कुकरमध्ये ठेवावे. झाकणी ठेवून अर्धा तास शिजत ठेवावी. नंतर उघडून पुन्हा उलथण्याच्या टोकाने खालीवर करावी. बाहेर काढून पुन्हा मंद चुलीवर एक वाफ येऊ द्यावी. खाली उतरवून त्यावर लिंबूरस शिंपडून ढवळावे. वाढायच्या भांड्यात काढून त्यावर खोबरे व कोथिंबीर घालावी.
    भात मऊ वाटल्यास वरून चमचाभर साजूक तूप घालावे. म्हणजे शिते मोकळी होतील.

You may also like