आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तांदूळ व भाज्या वेगवेगळ्या शिजवून घ्याव्यात. अर्धी वाटी खोबऱ्यात दोन वाट्या पाणी घालून मिक्सरमध्ये घुसळावे व गाळून घ्यावे. मिरच्या व कांदा उभ्या चिरावा. एका मोठ्या पातेल्यात ३ चमचे तूप तापवावे. त्यात शहाजिरे, मिरच्याचे तुकडे, कुस्करलेला पनीर, भात, भाज्या व मीठ घालून जरा परतावे. नीट मिसळले की बाजूला ठेवावे. वाटणाचा मसाला बारीक वाटून ठेवावा. दुसऱ्या पातेल्यात तूप तापले की त्यावर कांदा सोनेरी रंगावर परतावा. त्यावर वाटलेला मसाला परतावा. त्यावर मीठ, साखर व नार्ळाचे गाळलेले दूध घालावे. मंद आंचेवर दहा मिनिटे उकडू द्यावे. त्यात भाताचे मिश्रण घालावे व नीट ढवळून गरमगरम भात कोणत्याही करीबरोबर वाढावा.
You may also like