आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी कराव्यात. बटाटे उकडून, साले काढून मोठ्या फोडी कराव्यात. थोड्या बटाट्यांच्या फोडी पाण्यात कुसकरून ठेवाव्यात, म्हणजे आमटी दाट होतो. ओले खोबरे थोडेसे वगळून ठेवावे व बाकीच्या नारळाचे दूध काढून तयार ठेवावे.
तुपावर मोहरी टाकून कांदा परतून घ्यावा. त्यात टोमॅटोच्या फोडी टाकून थोडे पाणी घालावे. जरा दोनचार उकळ्या आल्या, की बटाट्यांच्या फोडी, पाण्यात कुसकरलेले बटाटे व नारळाचे दूध घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ व साखर घालावी. ओले खोबरे घालावे. रस जरा जास्तच असला पाहिजे. आमटी फार सुंदर होते. (हळद व गुळ घालू नये)
You may also like