आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- बटाटे स्वच्छ धुवून सोलावे. खलात किंवा पाट्यावर बटाटे बारीक ठेचावे. ठेचल्यानंतर बटाटा काळा पडतो म्हणून लगेच पाण्यात घालावा. सर्व बटाटे ठेचल्यानंतर पुन्हा स्वच्छ धुवावे. पातेल्यात तेल तापले की त्यावर मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून ठेचा फोडणीस टाकावा. अर्धी वाटी पाणी त्यावर शिंपडून झांकण ठेवावे व भाजी शिजू द्यावी. अधूनमधून थोडे पाणी शिंपडून भाजी परतावी. शिजत आली की तिखट, मीठ, साखर व जास्त तिखट हवी असल्यास हिरवे तिखट घालावे. ढवळून भाजी पूर्ण शिजवावी. वाढताना वरून लिंबू पिळावे. ओले खोबरे व कोथिंबीर घालून वाढावी.
You may also like