आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत. दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे. सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे. फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे. खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे.
ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.
You may also like