आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- १ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे.
दूध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा. पाणी गळायचे थांबले की काढून घ्या.
परातीत हे नासलेले दूध व मैदा ऐकत्र करुन खूप मळून घ्या. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करा.
एका उथळ पातेल्यात २ वाट्या साखरेत ४ वाट्या पाणी घालून कच्चा पाक करा. पाकाला उकळी आली की त्यात वरील सोडा.
गोळे शिजले की चमच्याने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवा, गार होऊ द्या.
कंडेन्सड मिल्कमध्ये दूध घालून सारखे करा. वेलदोड्याची पूड व केशर घाला. नंतर ह्या दुधात वरील गार झालेले गोळे सोडा.
You may also like