शाही पुलाव

(0 reviews)
शाही पुलाव

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तांदूळ धुऊन तासभर पाण्यात भिजवा. पातेल्यात चार कप पाणी टाकून गॅसवर ठेवा. भिजवलेले तांदूळ पाणी काढून गॅसवरील पातेल्यात शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा. पनीरचे चौकोनी तुकडे करा. गाजर सोलून चिरुन घ्या. मटारचे दाणे काढा. कांदा-लसूण व आले सोलून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले-लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून काढा. केशर २ चमचे पाण्यात भिजवा. एका कढईत तूप गरम करून काजू तळून घ्या. त्याच कढईत जिर्‍याची फोडणी देऊन कांदा परतून घ्या. नंतर लवंग, हिरवी वेलची, दालचिनी व काळी मिरी वाटून टाका. आता आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परता. पेस्ट चांगली परतल्यावर मटार, गाजर, पनीर, अननस, काजू, बेदाणे व चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा. दोन मिनीटे परतून शिजलेले तांदूळ व केशर टाकून नीट एकत्र करा, गॅस बंद करून गरमा-गरम वाढा.

You may also like