गोड भाकरी

(0 reviews)
गोड भाकरी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. गूळ पाण्यात विरघळला की पाणी गाळून घ्यावे. कणकेत तुपाचे मोहन, मीठ घालून गुळाच्या पाण्याने पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे. लागल्यास थोडे पाणी किंवा कणिक यांचे प्रमाण वाढवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. त्याच्या नेहमीसारख्या भाकऱ्या लाटून तव्यावर भाजाव्या. दोन्ही बाजूंवर थोडे तूप सोडून चुरचुरीत परताव्या. एका ताटात पसरून गार होऊ द्याव्यात.
    गंमत म्हणून एखादेवेळी त्यावर काजूचे काप भाकरी लाटतानाच पसरावेत म्हणजे लाटण्याने दाबले जातात. ही काजूची गोड भाकरी लोणी किंवा तूप व लोणचे, कोशिंबीर याबरोबर खावी.

You may also like