पुरणाची पोळी

(0 reviews)
पुरणाची पोळी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. डाळ २ तास भिजत घालावी. कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ चाळणीत ओतून त्यातील पाणी (कट) काढून उरलेले पाणी निघून जाईपर्यंत चांगली परतावी. नंतर त्यात किसलेला गूळ घालून त्याचे पाणी होऊन ते आटेपर्यंत कोरडी करावी व पुरणयंत्रात घालून वाटावी. वाटतानाच ७-८ वेलचीची पूड किंवा जायफळाची पूड घालावी. त्यानंतर कणीक मैद्याच्या चाळणीने चाळून त्यात अर्धा चमचा मीठ व १ पळीभर तेल घालून कणीक सैल भिजवावी. ती भिजवून झाल्यावर त्यात थोडे तेल घालून मळावी. लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारखा करून त्यात वाटलेल्या पुरणाचा गोळा घालून तांदळाच्या पिठावर लाटावी व मंद आचेवर भाजावी.

You may also like