फळांची बासुंदी

(0 reviews)
फळांची बासुंदी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. दूध निम्मे होईपर्यंत आटवावे. त्यात साखर घालून पाच मिनिटे चुलीवर ढवळावे. खाली उतरवून गार होऊ द्यावे.

    द्राक्षे पाण्यात भिजत ठेवावी. बेदाणा वेगळ्या भांड्यात तासभर भिजत ठेवावा. काजू साफ करून ठेवावे. बदामाचे जाड तुकडे करावे.

    बासुंदीत वेलचीपूड मिसळावी व फ्रीजमध्ये ठेवावी. छोट्या कढईत साजूक तुपात काजू व बदामाचे तुकडे परतावे. त्यात भिजवून धुतलेला बेदाणा अलगद परतावा. गार बासुंदीत हा मेवा घालावा.

    संत्री सोलून त्याच्या फोडी सुट्या कराव्या. वरचा पापुद्रा काढून फोडीचे दोन किंवा तीन लहान तुकडे करावे. सफरचंदाची साल व बिया काढून बारीक तुकडे करावे.

    केळ्याच्या छोट्या अर्धचंद्राकृती चकत्या कराव्या सर्व फळे बासुंदीत मिसळावी. दूध जास्त हवे असल्यास थोडे कंडेन्स्ड मिल्क घालावे.

    घाईगडबड असल्यास कंडेन्स्ड फळे व मेवा घालावा. मात्र साखर वगळावी व दाटसर वाटल्यास थोडे साईसकट दूध किंवा क्रीम घालून मिश्रण सरबरीत करावे.

You may also like