उकडीचे मोदक प्रकार १

(0 reviews)
उकडीचे मोदक प्रकार १

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे व दळून आणावे.प्रथम सारण तयार करून घ्यावे. पिवळ्या रंगाचा गूळ आणावा. तो विळीवर हलके हलके चिरावा. नंतर वाटीने मोजून साधारणपणे जेवढे ओले खोबरे मोजून भरेल त्याच्या निम्मा गूळ पुरतो. म्हणजे ३ वाट्या ओले खोबरे असेल तर दीड वाटी बारीक चिरलेला गुळ लागतो.

    खोबरे व गूळ हाताने कालवावे. गॅसवर ठेवून शिजवावे. नंतर खाली उतरवून त्यात वेलदोड्याची पूड घालावी व सारण थंड होऊ द्यावे. जरा मोठ्या व जाड बुडाच्या पितळेच्या पातेल्यात उकड काढण्यासाठी पाणी तयार करावे. वाटीने तांदळाचे पीठ मोजून घ्यावे. (सपाट) व जेवढे पाण्यातच तेलाचे किंवा तुपाचे मोहन पीठ असेल तेवढे मोजून पाणी ठेवावे व मीठ घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात वरील तांदळाचे पीठ वैरावे. उलथन्याच्या टोकाने ढवळावे. गॅस लहान करून झाकण ठेवावे व चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर पातेले खाली उतरवावे.

    जरा वेळाने त्यातली थोडी उकड ताटात काढून हाताला थोडे तेल व पाणी लावून मळावी. नंतर त्याचा मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारखा आकार करावा. त्यात वरील नारळाचे पुरण भरावे. नंतर मुखऱ्या करून मोदकाचे तोंड बंद करावे. असे ७।८ मोदक झाले की मोदकपात्रातील चाळणीवर कपड्याचा तुकडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालून त्यावर ठेवून १० मिनिटे वाफवावे. वरील प्रमाणात साधारण २१ मोदक होतात.

You may also like