मेथीचे गोड अप्पे

(0 reviews)
मेथीचे गोड अप्पे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. आदल्या दिवशी सकाळी तांदूळ आणि मेथी भिजत घालावी (जसे आपण ईडलीचे साहित्य पाण्यात भिजत घालतो तसे). रात्री ह्या मिश्रणात आवडीनुसार गूळ घालून किंचित जाडसर (ईडलीच्या पीठासारखे) वाटावे व एका भांड्यात ठेवावे.
    त्यामध्ये चवीपुरते मीठ व सोडा टाकून चांगले ढवळुन झाकून ठेवावे. दुसर्‍या दिवशी सकाळी अप्प्याचे भांडे धुवून कोरडे करुन त्याला तेल लावून ठेवावे.
    न्याहरीच्या वेळी अप्प्याचे भांडे गॅसवर ठेवावे, गॅस मोठा करून भांडे गरम करुन घ्यावे. गरम झाल्यावर गॅस मंद ठेवावा. अप्प्याच्या भांड्याच्या गोल गोल वाटीमध्ये थोडं-थोडं तेल ओतावे व त्यामध्ये वरील पीठ ओतावे.
    भांड्यावर झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी चांगले शिजल्यावर ते गोल अप्पे त्यामध्येच परत उलटावेत व दोन मिनीटे दुसरी बाजू भाजून ते भांडयातून काढावेत.
    ह्याच कृतीप्रमाणे सर्व पीठांचे अप्पे भाजून घ्यावेत आणि गरमागरम अप्पे खोबर्‍याच्या ओल्या चटणीसोबत किंवा सांबारासोबत खावेत.

You may also like