पीझ्झा

(0 reviews)
पीझ्झा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मैद्यात मीठ, साखर व मीठ व खमीर टाका व तूप आणि पाणी टाकून मळून घ्या. अर्ध्या तास ठेवल्यानंतर त्यचे चार लहान गोळे तयार करा. थोडे जाड लाटून घ्य. ओवन २०० डिग्री से. ला गरम करा. १० मिनीटे १-२ करुन चारी पोळ्या ( पीझ्झा ब्रेड ) भाजून घ्या.टॉमेटो, कांदा, आल, लसूण बारीक चिरुन एका कढईत टाकून भजून घ्या. पूर्ण पाणी शिजल्यावर लाल मिरची पावडर, साखर, मीठ व गरम मसाला टाका. एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्याच्यात कॉर्नफ्लावर टाका. हे मिश्रण गॅसवरील टॉमेटोच्या मिश्रणात टाका. मिश्रण जाडसर झाल्यावर त्याच्यात ढोबळी मिरची व गाजर बारीक चिरुन टाका. २ मिनीटे भाजून गॅस बंद करा. आता पीझा बेसवर हे मिश्रण पसरून त्याच्यावर चीज किसा. हा ब्रेड ओव्हनमध्ये १५० डिग्री से. ला ७ ते ८ मिनीटे ठेवा. आता बाहेर काढून त्याच्यावर टोमेटो सॉस टाकून गरम वाढा. खाण्याच्या सोईकरता चाकूने चिरुन लहान तुकडे करा. जर पीझ्झा बेस बाजारात मिळत असेल तर तेही आणून वर दिल्यानुसार मसाला टाकून पीझ्झा तयार करा.

You may also like