बटाटा वडा

(0 reviews)
बटाटा वडा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. बटाटे उकडून सोलून घ्या व कुसकरून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा. एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका, आता बटाटे मिसळून चांगले हलवा. थोडी साखर, लिंबू रस व मीठ टाका. चुली वरून उतरून घ्या.थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा. बेसन, धणा पावडर, एक चमचा गरम तेल व मीठ टाकून लापशी बनवा. जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा. बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा. सोनेरी लाल झाल्यावर काढून घ्या व गरम-गरम वाढा.

You may also like