सफरचंदाची चटणी

(0 reviews)
सफरचंदाची चटणी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. सफरचंदाची साल बिया व गाभा काढून गर किसावा. लाल मिरच्या थोड्या व्हिनिगरमध्ये भिजत ठेवाव्या. कांदा व लसूण बारीक चिरावी. गूळ चिरावा. सफरचंदाचा कीस, मिरच्या (व्हिनीगरसकट), तिखट, मोहरी, गूळ, लिंबाची साल वरस, सुंठीची पूड व तमालपत्रे एका मोठ्या पातेल्यात एकत्र करून चुलीवर ठेवावे. झाकण असू द्यावे. पण अधूनमधून ढवळत राहावे. मिश्रण मऊसर शिजले की उरलेले पदार्थ त्यात घालावे. मंद आंचेवर उकळू द्यावे. मधून ढवळावे. बुडाला लागू देऊ नये. चटणी जॅमसारखी दाट झाली की पृष्ठभाग चकचकीत दिसू लागला की खाली उतरवावी. लगेच तमालपत्रे काढून टाकावीत. स्वच्छ बाटल्या किंवा बरण्यामध्ये ही चटणी घालावी व झाकण लावून मेणाचे सील करावे.

You may also like