लाल भोपळ्याचे आंबाळ (आंबटगोड)

(0 reviews)
लाल भोपळ्याचे आंबाळ (आंबटगोड)

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. वाटीभर पाण्यात चिंच व गूळ तासभर भिजत घालावी. हाताने चांगली कुस्करून कोळावी व रस गाळून घ्यावा. भोपळ्याची साल काढून त्याचे २ सें.मी. रुंदीचे चौकोनी तुकडे चिरावे. कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मेथी घालावी. बदामी रंगावर मेथीदाणे आले की भोपळा आणि बडीशेप घालावी. हळद, तिखट, धनेपूड व जिरेपूड घालून अवसडावे किंवा अलगद ढवळावे. झाकण ठेवून ८-१० मिनिटे शिजू द्यावे. वाटल्यास थोडे गरम पाणी घालावे व अलगद ढवळून पाण्याचे झाकण ठेवावे. शिजत आले की चिंचगुळाचे पाणी घालावे व पाच मिनिटे उकळू द्यावे. आवडीनुसार तिखट किंवा मीठ जास्त घालावे.
    हा डोग्री प्रकार आहे आणि लग्न समारंभात आवर्जून करतात.

You may also like