आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- अंडी फोडुन घ्यावीत. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे.
अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.
कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे. नंतर त्याच्या दोन पुर्या लाटून घ्याव्यात.
एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी.
कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.
You may also like