आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- भाज्या एकत्र कराव्या. दही, क्रीम, साखर, मीठ व मिरपूड घालून वेगळे ढवळावे. बाजारी क्रीम नसल्यास घरची साय घोटून घालावी. तेही न जमल्यास दह्याचे प्रमाण दुप्पट करावे. मात्र दही आंबट नसावे. पसरट भांड्यात भाज्या घालून त्यावर दही हलकेच ओतावे. अलगद भांडे मिसळावे. फ्रीजमधे ठेवून थंडगार झाल्यानंतर खावे.
आवडीनुसार भाजलेले किंवा भिजवलेले शेंगदाणे, काजू किंवा अक्रोडाचा भरड चुरा किंवा भाजके चणे करून घालावे.
You may also like