मसालेदार खिचडी

(0 reviews)
मसालेदार खिचडी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. डाळ तांदूळ मिसळून तासभर धुवून ठेवावेत. कुकरच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद, मिरच्या क्रमाने घालून त्यावर डाळतांदूळ घालावेत. आंच कमी करून २-४ मिनिटे परतावेत. नंतर त्यात तिखट, मीठ, मसाला व गरम पाणी घालावे. कुकरमधे ( साध्या किंवा प्रेशर) खिचडी शिजवावी. वाढताना वरून खोबरे व कोथिंबीर शिवरावी. चमचाभर साजूक तूप वरून सोडावे म्हणजे शिते मोकळी होतात.
    घरात असल्यास, मूठभर शेंगदाणे, १-२ मध्यम कांदे किंवा बटाट्याच्या फोडी, मटारदाणे, भोपळी मिरची यापैकी खिचडीत काहीही घालता येते. मिरच्या घातल्यानंतर डाळतांदूळ घालण्यापूर्वी यांपैकी असेल ती भाजी घालावी. दोन मिनिटे परतून डाळतांदूळ घालावेत, मात्र गरम पाणी अर्धी वाटी जास्त घालावे.

You may also like