केशरी भात ( संत्री घालून)

(0 reviews)
केशरी भात ( संत्री घालून)

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तांदूळ धुवून तासभर बाजूला ठेवावे. ४ कप आधण पाण्यात तांदूळ वैरावे व १२-१३ मिनिटे प्रखर आंचेवर अर्धवट शिजवावे. चाळणीवर निथळावे व त्यावर थोडे गार पाणी ओतावे. एका ताटात भात पसरून गार करत ठेवावा.
    साखरेत एक वाटी पाणी घालून एकतारीपेक्षा जरा कमी असा सुधारसाइतपत पाक करावा. एका जाड बुडाच्या पातल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, दालचिनी व वेलदोडे फोडणीस टाकून त्यावर गार झालेला भात, संत्र्याच्या सालीचा कीस व पाक घालावा. संत्र्याचा रस काढावा व ताजा रस भातात घालावा. रंगाचे थेंब व काजूबदाम, बेदाणे (निम्मे) घालावे झाकण ठेवावे. पाच मिनिटांनंतर वाफ आली की पातेल्यासारखी एक तवा ठेवावा. केशर शिंपडावे व मंद आंचेवर भात पुरता शिजवावा.
    उरलेले काजूबेदाणे, वर्ख, चेरीज इत्यादी सजावट करून शोभिवंत भांड्यात भात ठेवावा.

You may also like