चणाडाळीचे कोफ्ते करी

(0 reviews)
चणाडाळीचे कोफ्ते करी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. डाळ दोन तास भिजत टाकावी. चाळणीत निथळावी. आले, मिरच्या व मीठ एकत्र भरडसर वाटावी. तेलाच्या हाताने या मिश्रणाचे लहान लाडू वळावेत व तेलात हे कोफ्ते तळून कागदावर निथळावेत.
    कांदे बारीक चिरावेत. आले-मिरच्या-लसूण व कांदे एकत्र वाटावेत. एका जड बुडाच्या पातेल्यात कढईतल्या उरलेल्या तेलातले थोडे तेल (सुमारे ४ ते ६ चमचे) घालावे. तेल तापले की जिरे, लवंगा, तमालपत्र, वेलदोडे घालावे. बदामी रंगावर आले की त्यात वाटलेला मसाला घालावा व परतावे. धनेपूड, तिखट, हळद एकत्र करून घुसळलेल्या दह्यात घालावी. नीट मिसळून दही व साखर मसाल्यावर ओतावी. तीन वाट्या पाणी घालून रस मंद उकळू द्यावा. ३-४ मिनिटे उकळल्यानंतर कोफ्ते घालावेत व पाच मिनिटे उकळू द्यावे. आंच अगदी कमी ठेवावी. वरून गरम मसाला व कोथिंबीर घालावी. चमचाभर अमूल किंवा साधे लोणी गरम करीवर घालावे व वाढावी.

You may also like