कोळंबीचा पुलाव

(0 reviews)
कोळंबीचा पुलाव

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. लसूण बारीक वाटून घ्यावी. नंतर थोडीशी हळद व वाटलेली लसूण कोळंबीला लावून ठेवावी.

    कांदा चिरुन घ्यावा व मसाला बारीक वाटून घ्यावा.

    एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून लवंग-वेलदोड्याची फोडणी करावी. नंतर त्यात मटारचे दाणे व कोळंबी घालून जरा परतावे.

    नंतर त्यात २-३ तास अगोदर धुतलेले तांदुळ घालून परतावे. तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मीठ व वाटलेला मसाला घालावा.

    नंतर मंदाग्नीवर भात शिजू द्यावा.

    पुलाव तयार झाल्यावर त्यावर एक चमचा साजूक तूप घालावे व एका लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावा.

    भाताला खाण्याच्या रंगात टाकून रंगीत कोळंबी पुलाव बनवू शकता आणि हा दिसायलाही सुंदर दिसतो.

You may also like