मटण मोगलाई सालन

(0 reviews)
मटण मोगलाई सालन

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मटणाचे तुकडे करून धुवून घ्या. कांदे पातळ चिरून घ्या. मटणाला मीठ, हळद व धणेपूड चोळून ठेवा.

    तूप तापवून त्यात मटण घालून मोठ्या आचेवर परतत रहा. मटण तांबूस झाले की, त्यात ३ कप उकळते पणी घालून घट्ट झाकण लावून मटण मऊ शिजवा.

    तुपात कांदा परतून बदामी करून घ्या.

    मटण शिजले की, त्यात कांदा घाला. वेलची, दालचिनी व ठेचलेली मिरी घाला.

    जरूर वाटल्यास पाण्याचा शिपका मारून परतत रहा. थोडा वेळ परतवून त्यात २ टेबलस्पून गरम केलेले तूप सोडा.

    बदाम दुधात वाटून घ्या. केशर थोड्या दुधात घोळून घ्या. मटणावर दोन्ही घालून एकत्र करून एक वाफ काढा.

    हे मटणाचे सालन पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

You may also like