मिरचीचे लोणचे

(0 reviews)
मिरचीचे लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे. धूर दिसेपर्यंत तापले की परातीतल्या जिनसांवर ओतावे व झाऱ्याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा.
    मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे. मिरची यंत्रात बारीक केली तरी बिघडत नाही. त्यात ४ चमचे वगळून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बारा लिंबचा रस काढून लोणच्यात घालावा.
    लिंबाच्या साली फेकून देऊ नयेत. सालीचेही चवदार लोणचे बनवता येते.

You may also like