आवळ्याचे लोणचे

(0 reviews)
आवळ्याचे लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. आवळे जरा कोचवून दहा मिनिटे वाफवून घ्यावेत. जिऱ्याची कच्चीच पूड करावी. चमचाभर तेलात ओवा जरा परतून घ्यावा. मोहरीची डाळ बाजारात मिळते ती मोठी असते. थोडा वेळ उन्हात ठेवून जरा कुठावी. त्यात थोडे ( अर्धा वाटी) पाणी घालून फेसावी व त्याची गुळगुळीत पेस्ट करावी. या फेसलेल्या मोहरीत सर्व मसल्याच्या पुडी, तिखट व हळद घालावी. मीठ सैंधव मिसळावे. एका स्वच्छ बरणीत तळाला थोडे मीठ घालावे. त्यावर थोडे आवळे घालावे. त्यावर मसाल्याचा एक थर द्यावा. त्यावर पुन्हा आवळ्याचा थर व त्यात पुन्हा मसाल्याचा थर द्यावा. शेवटचा थर मसाल्याचा असू द्यावा. तेल कडकडीत तपवून गार करावे व या मिश्रणावर ओतावे ७-८ दिवस ती बरणी दिवसा उन्हात ठेवावी पंधरा दिवसानंतर वापरायला घेण्या जोग लोणचे तयार होईल.

You may also like