टोमॅटोचे गोड लोणचे

(0 reviews)
टोमॅटोचे गोड लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. टोमॅटोच्या चार किंवा आठ फोडी चिराव्या, कल्हईच्या मध्यम पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे व हिंग व हळद घालून त्यावर टोमॅटो घालावे. जरा अवसडून किंवा अलगद ढवळून मंद आंचेवर शिजू द्यावेत. वर पाण्याचे झाकण ठेवावे, ८-१० मिनिटांनंतर दाण्याचे कूट, तिखट, मीठ व गूळ घालून पुन्हा ढवळावे दोन उकळ्या आल्या की खाली उतरावे. ३-४ दिवस फ्रीजमध्ये टिकते. सॉस‍ऐवजी देखील वापरता येते.

    सूचना :
    टोमॅटोची साल पुष्कळ मुलांना व मोठ्या मंडळींनाही आवडत नाही. तसे असल्यास प्रथम टोमॅटो मिनिटभर उकडीच्या पाण्यात ठेवून नंतर थंड पाण्यात ठेवावे. पाच मिनिटांनंतर बाहेर काढावे. साल सुटून येते. ती काढून टाकावी व आतल्या गराचे तुकडे करून फोडणीस टाकावे व शिजवावे म्हणजे खाताना सालपटे येणार नाहीत.

You may also like