फ्लॉवर-गाजराचे लोणचे

(0 reviews)
फ्लॉवर-गाजराचे लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कॉलीफ्लॉवर स्वच्छ करून बारीक चिरावा. पाने व मधला दांडोरा टाकून द्यावा. किंवा सूपमधे उपयोग करावा. गाजराच्या इंचभर लांबीच्या पातळ व बारीक कापट्या चिराव्या. धुतलेली भाजी पातळ फडक्यावर पसरून कोरडी होऊ द्यावी. पुदिन्याची पानेखुडावी. आले किसावे व लसूण सोलावी. लाल मिरच्यासह आले-लसूण-पुदिना थोडेसे व्हिनीगर घालून बारीक वाटावे. लवंगा, दालचिनी व मिरी यांची कुटून बारीक पूड करावी. गुळात उरलेले व्हिनीगर घालून जाड पाक करावा व बाजूला ठेवावा. भाज्यांचे तुकडे, वाटलेला मसाला, कुटलेली पूड व मीठ एकत्र मिसळावे. एका रुंद तोंडाच्या बरणीत भरावे. त्यावर गुळाचा गार झालेला पाक ओतावा व चांगले वळावे. चौपदरी दादरा बांधून ७-८ दिवस बरणी उन्हात ठेवावी. रोज सकाळी हलवावी. संध्याकाळी घरात आणून ठेवावी. आठवड्यानंतर लोणचे वापरण्यास हरकत नाही. मात्र बरणी कोरड्या जागी ठेवावी.

You may also like