वांग्याचे लोणचे

(0 reviews)
वांग्याचे लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या. गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे. कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी. त्यात वांग्याचे काप घालून हलक्या हाताने पातेलीत घालून अवसडावे. वांगी मंदाग्निवर शिजू द्यावीत. एकीकडे वेलची, लवंगा, दालचिनी व मिरी यांची बारीक पूड करावी. वांगी मधूनच एकदोनदा झाऱ्याने अलगद ढवळावीत. वांगी शिजली की गुळाचे मिश्रण घालावे. दाटसर रस होईपर्यंत शिजवावे. नंतर लवंग-दालचिनी इत्याचीची पूड घालावी. मोहरीची डाळ व मीठ घालावे. खाली उतरवून लोणचे गार होऊ द्यावे. नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. आठदहा दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.

You may also like