आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- लसूण बारीक वाटून घ्यावी. नंतर थोडीशी हळद व वाटलेली लसूण कोळंबीला लावून ठेवावी.
कांदा चिरुन घ्यावा व मसाला बारीक वाटून घ्यावा.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून लवंग-वेलदोड्याची फोडणी करावी. नंतर त्यात मटारचे दाणे व कोळंबी घालून जरा परतावे.
नंतर त्यात २-३ तास अगोदर धुतलेले तांदुळ घालून परतावे. तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मीठ व वाटलेला मसाला घालावा.
नंतर मंदाग्नीवर भात शिजू द्यावा.
पुलाव तयार झाल्यावर त्यावर एक चमचा साजूक तूप घालावे व एका लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावा.
भाताला खाण्याच्या रंगात टाकून रंगीत कोळंबी पुलाव बनवू शकता आणि हा दिसायलाही सुंदर दिसतो.
You may also like