आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- बटाट्याची साले काढून बारीक फोडी कराव्यात. गाजर व कांदाही बारीक चिरुन घ्यावा. आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात.
थोड्या डालडयावर कांदा बदामी रंगावर येईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात बाकीच्या भाज्या घालून अगदी थोडे पाणी घालून, शिजवून घ्याव्यात.
भाज्या मऊसर शिजल्यावर सर्व पाणी आटवून घ्यावे. नंतर त्यात मीठ, वाटलेला मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून भाजी थाळीत काढून ठेवावी.
दुधात अंड्यातले पिवळे घालून फेटावे. नंतर त्यात मैदा घालून पीठ तयार करावे. मीठ घालावे. एक तासभर मिश्रण तसेच ठेवावे.आयत्या वेळी अंड्यातले पांढरे खूप फेसून त्यात घालावे व डोशाप्रमाणे लहान लहान डोसे करावेत.प्रत्येक डोशावर वरील भाजी मध्यभागी १ डावभर घालून जरा पसरुन त्याची डोशाप्रमाणे घडी घालावी.दोन्ही कडेची टोके पुन्हा दुमडुन चौकोनी घड्या घालून सर्व डोसे ठेवावेत. आणि सॉससोबत खाण्यास द्यावे.
You may also like