आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- नाचणीला भिजवून मोड आणून वाफवावे. थोड्या तेलात मोहरी, जीरे घालून फोडणी घालावी.
यात मिरच्या, कढीपत्ता घालावा. आलं-लसूण पेस्ट घालवी. गाजर किसून, टोमॅटो चिरुन, मूग, मेथ्या सर्व घालून पाच मिनीटे शिजवावे.
२-३ वाफा आल्या की नाचणी घालावी. मीठ व लिंबूरस घालून ढवळून परत २ मिनीटे गॅसवर ठेवावे.
गरम गरम उपम्यावर कोथिंबीर व वाटल्यास शेव घालून खायला द्यावे.
You may also like